अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर दाखल होत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी - अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनर हेदेखील असतील. असं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांची ही काही 'फॅमिली ट्रीप' नाही. भारताशी व्यापार संबंध दृढ करण्याच्या निश्चयानं डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल होत आहेत.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलेनिया यांच्यासहीत एका उच्च प्रतिनिधिमंडळासोबत २४ फेब्रुवारी आणि २५ फेब्रुवारी रोजी भारतात दाखल होत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी ते अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन करतील. तर पुढच्या दिवशी ते प्रसिद्ध ताजमहलला भेट देतील.

यावेळी, ते पंतप्रधान मोदी यांच्यासोबत व्यापार संबंधांवरही चर्चा करणार आहेत. ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हे प्रतिनिधिमंडळातील वरिष्ठ सहाय्यकही आहेत. तर इवांका ट्रम्प या त्यांच्या प्रमुख सल्लागार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post