भारताने केला ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव


माय अहमदनगर वेब टीम - भारताने आज (शुक्रवार) सिडनीत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी धूळ चारली. भारताने महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग तिसऱ्यांदा पहिला सामना जिंकला. यापूर्वी भारताने 2018 वर्ल्डकपमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव केला होता. तर 2016 मध्ये बांग्लादेशला 72 धावांनी हरवले होते. भारतीय संघाची ऑस्ट्रेलियावर सलग दुसरा विजय आहे. 2018 मध्ये देखील भारताने कांगारूचा पराभव केला होता.

आज झालेल्या सामन्यात भारताकडून पूनम यादवे सर्वाधिक 4 गडी बाद केले. शिखा पांडे 2 आणि राजेश्ववरी गायकवाडने 1 विकेट घेतली. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकांत 4 गडी बाद 132 धावा केल्या होत्या. यात दीप्ति शर्माने 49 धावांचे योगदान दिले. शेफाली शर्माने 15 चेंडूवर 29 धावा केल्या. तर जेमिमा रॉड्रिग्स 20, कर्णधार हरमनप्रीत कौर 2 धावांवर बाद झाली. वेदा कृष्णामूर्ती 9 धावांवर नाबाद राहिली. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 19.5 षटकांत 115 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून एलिसा हिलीने सर्वाधित 51 धावा केल्या. तर अॅशले गार्डनर 34 धावांचे योगदान दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post