रानडुकराच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर तालुक्यातील जेऊर येथे मंगळवारी (दि. 25) पिसाळलेल्या रानडुकराने ससेवाडी रोडवरील माळवाडी परिसरात रानडुकराने अक्षरशः धुमाकुळ घातला होता. दिसेल त्याच्यावर हल्ला करत पिकाची ही मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात आली. या हल्ल्यात दोन महिला व एक पुरुष जखमी झाले आहेत. बाळासाहेब साहेबराव ससे, बबई बोल्हाजी मगर (वय 75), पारुबाई दत्तात्रय बनकर (वय 50) यांना या रानडुकराने चावा घेत गंभीर जखमी केले आहे. त्याचबरोबर बाबुराव बनकर यांच्या गायीवर हल्ला करुन जखमी करण्यात आले आहे. जखमी महिलांवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

माळवाडी परिसरातील वस्तीवर अंगणात काम करत असताना दोन महिलांवर डुकराकडुन हल्ला करण्यात आला तर पिकाला पाणी देत असलेल्या पुरुषावर हल्ला करुन जखमी करण्यात आले आहे. बाळासाहेब ससे यांच्या मनगटाला तर महिलांच्या पाठ व मानेवर चावा घेऊन जखमी करण्यात आले आहे.

सुमारे तीन तास वस्तीवर धुमाकुळ घातल्यानंतर स्थानिकांना रानडुकराला मारण्यात यश आले. वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक पी. एस.ऊबाळे, वनकर्मचारी तुकाराम तवले यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. जेऊर परिसरात रानडुकराच्या हल्ल्याने भितीचे वातावरण असुन रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच मधुकर मगर, उपसरपंच बंडु पवार, सुनिल पवार, आदिनाथ बनकर, बाबुराव बनकर, बंडु तोडमल, सौरभ बनकर, गौरव बनकर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post