अहमदनगर - अरणगाव येथील मेहराबादच्या टेकडीवर चालू असलेल्या अमरतिथी उत्सवात अवतार मेहेरबाबाच्या समाधीस्थळी शुक्रवारी दुपारी देश-विदेशातील ६० हजार मेहेरप्रेमींनी १५ पंधरा मिनिटे मौन पाळले.
बिगिन दि बिगिन ही धून पावणे बारा वा वाजवण्यात आली. त्यानंतर नगर सेंटरने मेहेरधून म्हणण्यात आली. दुपारी १२ वाजता मौनास सुरुवात झाली. यावेळी सर्वत्र शांतता होती. शांत वातावरण होते. १५ मिनिटानंतर अवतार मेहेरबाबा यांचा जयघोषात करत मौन सोडण्यात आले. यावेळी टेकडीवर सुमारे ६० हजाराच्यावर भाविक होते. कालपासून सुरु झालेल्या अमरतिथीसाठी चाळीस हजार भाविक बसतील असा भव्य मंडप आहे. त्याव्यतिरिक्त जेथे मिळेल भाविक बसून होते दुपारी ११.३० वाजता चेअरमन श्रीधर केळकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मेहेरनाथ कलचुरी, रमेश जंगले, थाडे बंधू आदी उपस्थित होते.
Post a Comment