खुशखबर...! उद्यापासून कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ सोमवार 24 तारखेपासून मिळायला सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थींची यादी लावण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी 28 फेब्रुवारीपासून लावण्यात येईल. योजना राबविताना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्यात येईल आणि एप्रिल अखेरपर्यंत सर्व अंमलबजावणी व्हावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सोमवारी 68 गावांची यादी लावण्यात येईल आणि लाभही तात्काळ मिळतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post