प्रवाशांची लुटमार करणारा रिक्षाचालक जेरबंद


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरात रात्रीच्या वेळी प्रवाशांची लुटमार करणारा रिक्षाचालकास कोतवाली पोलीसांनी अटक केली आहे. किरण विश्वासनाथ औसरकर (वय ३६, रा.बुरुडगाव, वाळकीरोड मनपा कचरा डेपो जवळ,अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, रिक्षा क्र.एमएच १६, बी ९४२८ या रिक्षाचालकाने चांदणी चौक, अहमदनगर येथून पुणे बसस्थानक येथे सोडण्यासाठी ८० रु.भाडे ठरवून पैसे सुटे नाहीत, पुढे जाऊन पैसे सुटे करून घेऊ असे सांगून रिक्षाचालकाने आयुर्वेद काँर्नर परिसरात निर्जनस्थळी नेऊन मारहाण केली. जवळील खिशातील ४९०० रुपये बळजबरीने काढून घेतले, अशी फिर्याद सुदर्शन बाबासाहेब देशमुख (रा.सोलापूर) कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती, त्याअनुषंगाने आरोपींचा शोध घेऊन आरोपी किरण औसरकर याला रिक्षासह पकडण्यात आले.

प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पो.नि.विकास वाघ, उ.पो.नि.सतिष शिरसाठ यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोना गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, पोकाँ भारत इंगळे, सुजय हिवाळे आदिंच्या पथकाने कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post