साडेतीन तोळे सोने लांबविलेमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरामध्ये सोनसाकळी चोरीचे प्रकार सुरूच असून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे सोने धूमस्टाईलने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातेवाईकांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रमासाठी रेणुका हारेर (रा. पुणतांबा ता. राहता) या नगरमध्ये आल्या होत्या. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सावेडी गावाच्या कमानी जवळून रेणुका पायी चालल्या होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण व एक तोळ्याचे मिनी गंठण असे साडेतीन तोळे सोने ओेरबडून नेले. रेणूका हारेर यांना आरडाओरडा करण्याच्या आत भामट्याने पोबारा केला. तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post