वारीस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा भाजपकडून निषेध ; प्रतिमेला जोडे मारून पुतळा जाळला


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्त्यव्याचा आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. शहराजील्ह्याध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून वारीस पठाण यांच्या बेताल व्यक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुचाकी मोर्च्या काढून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वारीस पठाण यांच्या प्रतिमेस चपला मारून प्रतिमेचे दहन केले. तसेच वारीस पठाण यांच्यावर कायदेशीर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन तहसीलदार उमेश पाटील यांना दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जेष्ठ नेते वसंत लोढा, अभय आगरकर, सुनील रामदासी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, महिला बालकल्याण सभापती लता शेळके, नगरसेवक रवींद्र बारस्कर, अजय चितळे, पंकज जहागीरदार, सतीश शिंदे, वसंत राठोड, गौतम दिक्षित, सचिन पारखी, नरेंद्र कुलकर्णी, दत्ता हिरणवाळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलना नंतर वसंत लोढा यांनी कोतवली पोलीस स्टेशनमध्ये वारीस पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वैय्यक्तिक तक्रार दिली.

महेंद्र गंधे म्हणाले, वारीस पठाण यांनी हिंदू मुस्लीम समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे चिथवनिखोर वक्त्यव्य केले आहे. या वक्त्याव्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करत आंदोलन केले आहे.

वसंत लोढा म्हणाले, जातीय तेढ निर्माण करणारे वारीस पठाण हे लावारिस पठाण आहेत. त्यांच्या भाषेला जशासतसे उत्तर आम्ही देऊ शकतो. आम्ही हिंदूंनी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. मात्र समाजात अशांतता आम्ही पसरवू इच्छित नाही. यादेशात मुस्लीम समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानाची वागणूक देत आहेत. तरीही असे आगलावे वारीस पठाणांविरोधात भाजपा शांत बसणार नाही.

अभय अगरकर म्हणाले, या देशात हिंदू मुस्लीम समाज एकत्र नांदत आहे. असे असतांना वारीस पठाण यांचे व्याक्त्याव्य गृन्हा आणणारे आहे. त्यांना ताबडतोब अटक करून गंभीर स्वरूपाचे कलमे लावावीत.

महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, वासीर पठाण यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. म्हणूनच ते असे वेड्यासारखे भाष्य करत आहेत. त्यांच्यावर तातडीने देश विरोधात भाष्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा.

यावेळी अनिल गट्टाणी, सुहास मुळे, महावीर कांकरिया, शिवाजी दहींडे, जगन्नाथ निंबाळकर, अन्वर खान, बाळासाहेब गायकवाड, धनंजय जामगावकर, शाकीर सय्यद, संजय ढोणे, विवेक नाईक, उमेश साठे, उदय कराळे, विलास ताठे, महेश नामदे, गणेश साठे, सोमनाथ चिंतामणी, राजेंद्र घोरपडे, सचिन चोरडिया, संतोष शिरसाठ, प्रकाश सैदर, शरद मुर्तडक आदि उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post