सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती पुरस्कार माझ्यासाठी अजरामर पुरस्कार:-पद्मश्री पोपटराव पवार


सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठान पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांना प्रदान!
माय अहमदनगर वेब टीम
पुणे:-भोसरे ता .खटाव येथील सरसेनापती प्रतापराव गुजर स्म्रूतीअधिष्ठान व भोसरे ग्रामस्थ यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठान पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार यांना प्रदान करण्यात आला. दरवर्षी हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना दिला जातो.

'माझ्यासाठी हा पुरस्कार माझ्या हिवरेबाजारच्या शिरपेचात मानाचा तुरा असून हा माझ्यासाठी अजरामर पुरस्कार असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील,खा.रणजितसिंह निंबाळकर, डॉ. अविनाश पोळ, डॉ.दिलीप येळगावकर, उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर, जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे, डॉ. अनिल जाधव, प्राचार्य सुधीर इंगळे, सपोनि उत्तम भापकर, आबासो लाड, जितेंद्र शिंदे, सरपंच नितीन जाधव, उपसरपंच हणमंत गुजर, विष्णुशेठ जाधव, तानाजी देशमुख, प्रा.सुधाकर कुमकर, संतोष जाधव, विजय जाधव, कैलास गुजर, अविनाश गुजर, भाऊसाहेब जाधव, सचिन गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पोपटराव पवार म्हणाले की,जोपर्यंत लोकांच्या मनात माझे गाव,माझी झाडे,'माझे'म्हणण्याची मानसिकता रुजत नाही तोपर्यंत ग्रामविकासाला बळ मिळत नाही. एखादे काम प्रामाणिकपणे केल्यास हमखास यश मिळते, पाण्यावरची लढाई आता जगाची झाली आहे. त्यामुळे गावागावात पाण्याचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे, छत्रपती शिवरायांनी शेतीसाठी, पाण्यासाठी केलेली नियोजनाचा इतिहास ग्रामीण भागातून वाचायला मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.भोसरे गावाचे नाव आज राज्यात मोठ्या आदराने घेतले जात आहे. गावाची एकी अशीच अखंड ठेवा, सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे विचार युवकांनी आत्मसात करून त्यांचा वारसा जपण्याचे काम युवापिढीने करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

नितीन बानगुडे पाटील म्हणाले की,भोसरे गावाला पोपटराव पवारांच्या रूपाने प्रतापरावांचे दर्शन झाले आहे,'वेडात मराठे वीर दौडले सात'त्यातील एक वीर भोसरे गावचा होता हे प्रत्येकाने लक्षात ठेवून मी एक नसून लाख आहे,आत्मविश्वासाने कार्य करीत रहावे.

डॉ अविनाश पोळ म्हणाले की, लोकसहभागातून ग्रामविकास शक्य आहे, हिवरेबाजार हे जिवंत उदाहरण आहे, संत गाडगेबाबा,आर.आर. पाटील ते पोपटराव पवार असा इतिहास ग्रामविकासाच्या बाबतीत लिहिला जाईल,भोसरे गावाने समृद्ध गाव योजनेत उल्लेखनीय काम करावे, ग्रामविकासाची चळवळ जागृत ठेवण्याचे काम करूयात.

खा.रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की,प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमिला महाराष्ट्रात एक वेगळे स्थान देण्यासाठी प्रयत्न करणार असून भोसरे गावाला सर्वतोपरी मदत करणार, त्यासाठी मार्चच्या अगोदर वेगळा आराखडा बनवू.

यावेळी डॉ दिलीप येळगावकर,विश्वास गुजर,सपोनि उत्तम भापकर,भगवानराव जगदाळे, सुधीर इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.तत्पूर्वी गावातून ज्योतीचे स्वागत करून सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन तानाजी देशमुख यांनी तर प्रास्ताविक सरपंच नितीन जाधव यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post