अहमदनगरमध्ये शिवसेनेने वारिस पठाण यांचा पुतळा जाळला, म्हणाले 'त्यांना' पाकिस्तान पाठवा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. नगरमध्ये शिवसेनेने वारिस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले. त्यानंतर तो पुतळा जाळण्यात आला. ‘वारीस पठाण मुर्दाबाद, पाकिस्तान को भेज दो’, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. शिवसैनिकांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

वारिस पठाण यांनी दोन दिवसांपूर्वी हिंदू मुस्लिमांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याने या वक्तव्याचा सर्व स्तरातून तीव्र निषेध होत आहे. अनेक मुस्लीम समुदायानेही पठान यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आम्ही पठाण यांच्यासोबत नसल्याचे अनेक मुस्लीमांनी आणि त्यांच्या समुदायाने स्पष्ट केले आहे. नगर येथील सुभाष चौकामध्ये शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. त्यांनतर हा पुतळा जाळून पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, दत्तात्रय कावरे ,संतोष गेनप्पा, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शशिकांत देशमुख, रमेश खेडकर, मदन आढाव, पप्पू भिंगारदिवे, गणेश झिंजे , शिवसैनिक व पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी वारीस पठाण हा गद्दार असून त्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, अशा व्यक्तीला या देशांमध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्याला पाकिस्तानमध्ये पाठवून द्या, असे सांगितले. या देशात राहून जर कोणी गद्दारीची भाषा करणार असेल तर त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. अशा गद्दारांना पाकिस्तानातच हाकलून द्या, अशी मागणी त्यांनी केली. पाकिस्तानमध्ये हिंदू अशाप्रकारचे वक्तव्य करू शकतो काय, असा सवालही त्यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post