पोलिसांच्या 'या' भूमिकेमुळे महिलेला मिळाले तिचे दागिने


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -मोहिनीनगर केडगाव येथील हसिना दाऊद शेख या १४/८/२०१९ रोजी ५ वाजता कोंढापुरी ता.शिरूर.जी.पुणे येथे जाण्यास केडगाव अंबिकानगर बस स्टॊपवरून निघाल्या. एक पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसल्या असता त्यानंतर कर केडगाव बायपास शिवारातील सत्कार मंगल कार्यालयाच्या पाठी मागे काही अंतरावर नेवून फिर्यादीस गाडीच्या खाली उतरवून स्क्रूड्रायव्हरचा धाक दाखवून ४०,००० रुपये किमतीचे एक तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र, दोन अर्ध्या टोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या, कानातील सोन्याची फुल व सोन्याचे वेल बळजबरीने काढून नेले आहे,असे फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद गु.र.न.१२२९/२०१९ भा.द.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे दि.१६/८/२०१९ रोजी करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा हा आरोपी नाव दत्ता उर्फ दत्तात्रय रामदास गाडे,वय ३२ वर्ष रा.गुनाट ता.शिरूर जी.पुणे याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास गुन्ह्यात अटक करून त्याचे कडून फिर्यादी हसिना दाऊद शेख यांच्या अंगावरील १) एक तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र २)कानातील सोन्याची फुल व सोन्याचे वेल असा ऐवज जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील जप्त सोन्याचे दागिने हे मोहिनीनगर केडगाव येथील फिर्यादी हसिना दाऊद शेख याना परत देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील,संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरशहर विभाग,अहमदनगर व विकास वाघ,पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पो.ना.नकुल टिपरे, पो.हेड काँ.डी.डी. साबळे, महिला पोलीस सुद्रिक, पो.ना.गोरक्षनाथ काळे, पो.ना.मोहन भेटे यांनी विशेष कामगिरी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post