माय अहमदनगर वेब टीम
शिर्डी : साईबाबांचे जन्मस्थळ शिर्डी की पाथरी, या वादात परभणी जिल्ह्यात पाथरी येथील विकास आराखड्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करताच शिर्डीकर संतापले असून ग्रामस्थांनी रविवार, १९ जानेवारीपासून बेमुदत शिर्डी बंदची घोषणा केली आहे. गुरुवारी बैठकीत बंदचा हा निर्णय एकमताने घेण्यात आला. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शनिवारी ग्रामसभा घेण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील पाथरी (जि. परभणी) हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याची अनेक वर्षांपासून धारणा आहे. या मुद्द्यावरून सध्या वादाचे मोहोळ उठले आहे. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून पाथरीच्या विकास आराखड्याचे लवकरच भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दाैऱ्यावर असताना केली होती. या घोषणेनंतर शिर्डीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ग्रामस्थांची बैठक झाली.या बैठकीत बेमुदत बंदचा निर्णय घेण्यात आला. या वेळी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते,अभय शेळके पाटील, शिवाजी गोंदकर, विजय कोते, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर, तुकाराम गोंदकर, सुनील गोंदकर, सचिन कोते, गणेश कोते, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, गनीभाई, जमादार इनामदार, रवींद्र गोंदकर, दीपक वारुळे, तानाजी गोंदकर आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment