माय अहमदनगर वेब टीम
श्रीनगर: प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या ५ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील हजरतबल भागातून या दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या, हातबॉम्ब आणि इतर सामुग्री जप्त केली आहे. प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये मोठा घातपात करण्याचा यांचा डाव होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांकडून या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे. आणखी दहशतवादी कारवायांची माहिती या दहशतवाद्यांकडे असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Post a Comment