माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता पाकिस्तानला आणखी एक जोरदार धक्का बसला आहे. भारताच्या नकारामुळे पाकिस्तानमध्ये नियोजित असलेली आशिया कप २०२० ही स्पर्धा पाकिस्तानात खेळली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. भारताच्या नकारानंतर आता स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात येणार आहे.
एका अहवालात मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषक २०२० या स्पर्धेच्या महिनाभर आधी आशिया कप २०२० खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण पाकिस्तानकडून या स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आता बांग्लादेश, श्रीलंका किंवा दुबई या पर्यायांचा विचार केला जात आहे. आशिया कप स्पर्धा टी २० प्रकारात खेळली जाणार आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून आशिया कप स्पर्धा टी २० पद्धतीने खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टी २० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.

Post a Comment