पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन संघ विजयी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पंजाबी समाज व पंजाबी ऑर्गनायझेशन आयोजित पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धा नगर क्लबच्या मैदानावर उत्साहात पार पडली. यामध्ये किंग्ज इलेव्हन संघाने अंतिम सामना जिंकून विजयी चषकावर नांव कोरले. विजयी संघास काकशेठ नय्यर, राकेश गुप्ता, अजय पंजाबी, निप्पू धुप्पर, देवेंद्रसिंह वधवा, दिनेश बत्रा, जनक आहुजा यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले.

पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत 3 दिवस-रात्र क्रिकेटचे सामने सुरु होते. यामध्ये 10 संघांचा समावेश होता. क्रेजी क्रिकेट टुर्नामेंट असल्याने खेळाचे अनेक मनोरंजनात्मक नियम व अटी होत्या. या स्पर्धेत युवकांसह अबालवृध्दांनी सहभाग नोंदवत खेळाचा आनंद लुटला. अंतिम सामना जग्गी चॅलेंजर्स विरुध्द किंग्ज इलेव्हन या संघात अत्यंत अटीतटीचा झाला. यामध्ये किंग्ज इलेव्हन संघाने जग्गी चॅलेंजर्स संघावर विजय मिळवला. ढोल, ताश्यांच्या गजरात विजयी संघाने मैदानावर जल्लोष केला. मॅन ऑफ मॅच अंकित दुग्गल, उत्कृष्ट फलंदाज विजय वधवा, उत्कृष्ट गोलंदाज पुनीत बतरा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरव ओबेरॉय, क्रेजी खिलाडू टूर्नामेंट विनय कथुरिया, मॅन ऑफ दी सिरीज रोहित वीजन यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. तसेच विजयी संघ किंग्ज इलेव्हन संघाचे कर्णधार अमृत सिंघ व उपविजयी संघ जग्गी चॅलेंजर्सचे कर्णधार तेजस जग्गी यांना चषक प्रदान करण्यात आले.


यावेळी मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी लहान मुला-मुलींची एकत्रित सामने देखील खेळविण्यात आले. तसेच पुढील वर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील क्रिकेट टुर्नामेंट घेण्याचे काकाशेठ नय्यर यांनी जाहीर केले. प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी सर्व खेळाडूंनी या स्पर्धेत खेळाडू वृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच विविध समाजाच्या वतीने शहरात क्रिकेट लीगचे आयोजन केले जात आहे. यामधील विजेता, उपविजेता संघाची एकत्रितपणे टुर्नामेंट घेतल्यास सामाजिक सलोखा वाढविण्याच्या दृष्टीकोनातून पंजाबी समाज व पंजाबी ऑर्गनायझेशन पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, समर्पण ग्रुपच्या अध्यक्षा रूपा पंजाबी, जी.एन.डी. ग्रुपचे संजय अहुजा, सुरेंद्र धुप्पड, नितीन गुरली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश सबलोक, अभिमन्यू नय्यर, रितेश नय्यर, मनप्रीतसिंग धुप्पड, चेतन आहुजा, वीरेंद्र ओबेरॉय, हितेश कुमार, पियूष जग्गी, जतीन आहुजा, किशोर कंत्रोड, अमरजीतसिंह शाही, परमजीतसिंह अरोरा, पिंकी मक्कर, जसपाल कंधारी आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत गौरव नय्यर यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रमुख प्रायोजक फोक्सवॅगन, सह प्रायोजक इंस्पायर कॉम्प्युटर, ग्रीन व्हॅली स्कूलचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हीतेश ओबेरॉय, रोहन धुप्पड, बलजीत सिंग बिलरा, सावन छाब्रा, मनयोगसिंह माखीजा, प्रीती ओबेरॉय, हरविंदरसिंग नारंग, रवींद्रसिंह नारंग, विजय पंजाबी, मोहित पंजाबी, सागर पंजाबी, अर्जुन मदान, अशिष कुमार, सनी आहुजा, विशाल बक्षी, हर्ष बत्रा, सतिंदरसिंह नारंग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बक्षी यांनी केले. आभार अनिष आहुजा यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post