जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी केला पदाचा गैरवापर


केडगाव येथील स्वस्त रेशन धान्य दुकान हे दुसऱ्या दुकानात विलीन / वंचित बहुजन आघाडी व भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने पुरवठा अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
माय अहमदनगर वेब टीम 
 अहमदनगर - जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी त्यांच्या पदाचा बेकायदेशीर रीत्या वापर केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करून नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना निवेदन देताना सुनील शिंदे, सागर भिंगारदिवे, विनोद गायकवाड, दिलीप साळवे, लखन राठोड, मेहेर कांबळे, किरण जाधव, करण भोसले, रीतीक लदे, विशाल साबळे, वैभव उमाप, शुभम ससाने, अजय पगारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

 केडगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ७६ हे बेकायदेशीररित्या दुकान क्रमांक ८४ या दुकानात विलीन करण्यात आले दरचे दुकान विलीन करण्याकरिता आवश्‍यक असणाऱ्या कायदेशीर बाबींची तंतोतंत पालन केले नाही वास्तविक कोणतेही स्वस्त धान्य दुकान हे इतर दुकानास विलीन करण्यासाठी अगोदर स्वस्त धान्य दुकान चालवणार्या व्यक्तीस कायदेशीर रित्या नोटीस देणे आवश्यक आहे सदरचे नोटीसमध्ये दुकान विलीन करण्याबाबत चे मुद्दे स्पष्ट व सविस्तरपणे नमूद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे दुकान क्रमांक ७६ विलीन करण्याअगोदर त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांना त्यांच्याकडून खुलासा देणे आवश्यक झाले नाही त्या कारणाने दुकान क्रमांक ७६ चे मालक यांना त्यांचे म्हणणे न ऐकताच दुसऱ्या दुकानात विलीन करण्यात आले सदरचे संपूर्ण प्रकरण हे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी जाणीवपूर्वक बेकायदेशीर रीत्या तसेच स्वतःच्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर कारवाई केली आहे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केलेली कारवाई ही कायद्याला धरून नाही त्याच प्रमाणे कायदेशीर रित्या आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी चे उल्लंघन केले आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कामकाज हे हुकुमी व जुलमी पद्धतीचे आहे सदर अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे दुकान क्रमांक ७६ चालक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व जाणीवपूर्वक सदरची बेकायदेशीर कारवाई केली आहे त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी हे त्या पदास योग्य नाहीत त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई होऊन कडक शासन करण्यात यावे व येत्या ८ दिवसात माळी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा मार्केट यार्ड समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ च्या सर्व पदाधिकारी आमरण उपोषण करण्यात येईल

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post