माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या दिल्ली भाजप नेत्यांच्या वादग्रस्त पुस्तक आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर बंदी घालून जयभगवान गोयल लिखित लेखकावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे छावा संघटनेच्यावतीने निवेदन नायब तहसीलदार (गृह) राजेंद्र दिवाण यांना देऊन चर्चा करताना यावेळी छावा संघटनेचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे समवेत नितीन पटारे, देवेंद्र लाबे, अविनाश सातपुते, यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे, रंजना उकिरडे, महेश चव्हाण, अक्षय झीने, सचिन खंडागळे, किशोर शिकारे, रमेश म्हसे, अमोल वाळुंज आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
छावा संघटनेचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे म्हणाले की संपूर्ण देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी किंवा तुलना कोणीही करू शकत नाही म्हणून जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालावी तसेच जयभगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अ. भा छावा संघटनेच्यावतीने करण्यात आली व सरकारने वरील पुस्तकांवर तात्काळ बंदी घालून लेखकावर गुन्हा दाखल न केल्यास अ.भा छाव संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे
Post a Comment