टायगर श्रॉफला बेड्या घालून नेत होते पोलिस, फोटो व्हायरल


माय अहमदनगर वेब टीम
जयपूर- बागी-3 च्या शूटींगासाठी टायगर श्रॉप मागील 3 दिवसांपासून जयपूरमध्ये आहे. सोमवारी टायगरने जयपूरच्या अनेक भागांमध्ये शूटींग केली. परकोटेच्या जलेब चौकमध्ये झालेल्या शूटींगचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात टायगरला बेड्या ठोकून पोलिस नेत असताना दिसत आहे. शूटींग पाहण्याठी शेकडो लोक जमा झाले होते.


रविवारी त्रिपोलिया गेटवर झाली शूटिंग
यापूर्वी रविवारी शहरातील त्रिपोलिया गेट चांदनी चौक एरिया (सिटी पॅलेस)मध्ये चित्रपटाची शूटींग झाली. यावेळेस टायगर श्रॉप विना हेल्मेट बाइक चालवताना दिसला तर रितेश देशमुख पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला. या दोघांचे पात्र पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post