जिल्हा बँकेच्या ठरावा वरून सेवा सोसायटी सचिवाचे अपहरण


माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सेवा संस्था मतदार संघाच्या प्रतिनिधीसाठी ठराव ज्याच्या नावे होईल तो आपल्या बाजूचा असावा यासाठी रणनीती आखली जात असताना तालुक्यातील कोथुळ सेवा संस्थेच्या ठरावासाठी संचालक मंडळाची मिटिंग होऊ नये म्हणून या सेवा संस्थेच्या सचिव राजेंद्र खोल्लम याचे अपहरण करण्यात आले.

याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहटासह इतर सहा जणांच्या विरोधात बेलवंडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post