भाजपा नगरसेविका सोनाली चितळे यांनी दिला प्लॅस्टिक मुक्तीचा नारा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - दिवसेंदिवस पर्यावरणात होत चाललेल्या बदलामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे मनुष्याला विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिक मुक्ती अतिशय गरजेची असून या प्लॅस्टिक मुक्तीसाठी भाजपाच्या नगरसेविका सोनाली चितळे यांनी व्यापक मोहीम हाती घेत प्रभागात जनजागृती सुरु केली आहे. घरोघरी जावून प्लॅस्टिक मुक्ती बाबत नागरिकांचे प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाचा शुभारंभ नगरसेविका सोनाली चितळे यांनी गाडगीळ पटांगणातील भाजी बाजारात जावून केला. त्यांनी भाजी व्यावसायिकांना प्लॅस्टीकमुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे वातावरणात बदल होत आहेत. याबाबत जनजागृती केली. प्लॅस्टिक मुक्तीचा नारा देत प्रत्येक नागरिकांना कापडी पिशवी वापरावी यासाठी प्रभागामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जावून जनजागृती करणार आहे. नगर शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी प्रभागातील नागरिकांना प्लॅस्टिक मुक्तीच्या उपक्रमामध्ये सहभागी करुन घेणार आहे. नगर शहरातील भाजी विक्रेत्यांनीही प्लॅस्टिकचा वापर टाळून नागरिकांना कापडी पिशवी वापरण्यासाठी जनजागृती करावी.असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रभाग क्र. १३ हा प्लास्टिकमुक्तीबरेाबर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. स्वच्छतेतून नगर शहर समृद्धीकडे जाणार आहे. विकासकामाबरोबर प्रभागामध्ये नागरिकांच्या सहकार्यातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहे. नागरिकांनी प्लॅस्टिक वापरावर बंदी घालून नगर शहर प्लॅस्टिक मुक्तीसाठी सहकार्य करावे. नगर शहरातील प्रत्येक नागरिकांना स्वच्छ शहर व प्लॅस्टिक मुक्त शहर राहण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेविका सोनाली चितळे यांनी केले.
संत गाडगे बाबा यांनी समाजामध्ये स्वच्छतेसाठी गावोगावी जावून स्वच्छतेची जनजागृती केली. परंतु नागरिक तरीही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. शासनाच्या स्वच्छतेच्या सामाजिक उपक्रमामध्ये नागरिकांनी भाग घेतल्याशिवाय स्वच्छतेचा उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी स्वच्छतेचा उपक्रम लोकचळवळ होण्याची गरज आहे.असे ही त्या म्हणाल्या.
Post a Comment