माय अहमदनगर वेब टीम : 62 व्या ग्रॅमी अवॉर्ड्सचे आयोजन लॉस एंजेलिसमध्ये झाले. प्रियांका चोप्रा आपला पती निक जोनससोबत या अवॉर्ड सेरेमनीमध्ये सामील झाली होती. यादरम्यान प्रियांकाचा रेड कार्पेटवर ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. प्रियांकाने डिझायनर राल्फ रूसोचा गाउन घातला ज्याची नेकलाइन खूप डीप होती. या गाउनसोबत तिने स्टेटमेंट ईयररिंग्स घातल्या होत्या. निक गोल्ड सूटमध्ये क्लासी दिसला. प्रियांकाने निकसोबतचे आपले फोटो इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत.
निकला त्याचे भाऊ केविन आणि जो जोनससोबत गायलेले गाणे 'सकर' साठी बेस्ट पॉप डुओ/ग्रुप परफॉर्मन्स कॅटॅगरीमध्ये नॉमिनेशन मिळाले. याव्यतिरिक्त जोनस ब्रदर्स 'व्हाट ए मॅन गोट्टा डू' आणि 'फाइव्ह मोर मिनट्स' यांसारख्या गाण्यांवर परफॉर्म केले. यादरम्यान प्रियांका, सोफी टर्नर आणि डॅनियल जोनससोबत प्रेक्षकांच्या रांगेत बसून जोनस ब्रदर्सला चीयर करताना दिसली.
Post a Comment