राहुल गांधी यांच्या गळ्यात पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची माळ!
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- काँग्रेस नेतृत्वाने राहुल गांधी यांना रिलाँच करण्याच्या योजनेस अंतिम रूप दिले आहे. पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे की, सोनिया गांधी सक्रिय राजकारणापासून लांब राहत आहेत. यामुळे मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलपर्यंत राहुल पुन्हा पक्षाचे अध्यक्ष बनू शकतात.
जयपूरमध्ये मंगळवारी काँग्रेसची युवा आक्रोश रॅली अायोजित करण्यात आली आहे. यानंतर राहुल गांधी देशातील सर्व मोठ्या राज्यांमध्ये सभा घेतील. ते केरळमधील कलपेट्टामध्ये सभा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते झारखंड व इतर काँग्रेसशासित राज्यांमध्ये सभा घेतील. राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांचा प्रमुख पर्याय म्हणून पुढे आणण्याचा पक्षाचा हेतू आहे. सभांमध्ये वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेतील मंदी, शेती संकट, घटनात्मक मूल्यांचे रक्षण, नागरिकत्व कायदा यावर राहुल गांधी यांचा मुख्य भर राहणार आहे. बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये सभा घेतील.
Post a Comment