एसटी-रिक्षाच्या भीषण अपघात ७ ठार


माय अहमदनगर वेब टीम
नाशिक: मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस-अपे रिक्षा यांच्यात जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने एका विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसटी बसचा टायर फुटल्याने बसने अपे रिक्षाला धडक दिली. कळवण डेपोची उमराणे - देवळा बस आणि रिक्षा दोन्ही विहिरीत कोसळल्या. धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ हा अपघात झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post