करोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्लीः चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या करोना विषाणूमुळे आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसची हजारो लोकांना लागण झाली असून, यामुळे जगभरात घबराट पसरली आहे. चीनमधील वुहान शहरातून करोना विषाणू जगभरात पसरला आहे. या संसर्गजन्य व्हायरसचे रुग्ण भारतातही आढळून आले असून, अद्याप कोणालाही याची लागण झाल्याचे प्रकरण समोर आलेले नाही.

भारतातील मुंबई, जयपूर, दिल्ली या शहरांमध्ये करोना व्हायरसची लक्षणे असलेले रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण चीनमधून भारतात आले असून, या रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यांतील कोणालाही करोना रोगाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आतापर्यंत ३५ हजार प्रवाशांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

भारतातील हवामान बदलत असून, करोना विषाणूंचा धोका वाढल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सामान्य सर्दी आणि करोना रोगाची लक्षणे सारखीच असल्यामुळे नागरिकांमध्ये जास्त घबराट पसरली आहे. करोना व्हायरस सुरुवातीला सामान्य सर्दीसारखा भासतो. मात्र, त्यानंतर श्वास घेण्यात अडचणी येतात. अंगदुखी वाढीस लागते, यावरून करोना रोगाची लागण झाल्याचे निदान होते. हा आजार बळावल्यामुळे निमोनिया, किडणी फेल यांसारखे भयंकर आजार होऊन प्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post