प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गोरगरीब जनतेची कामे करावीत - आ.निलेश लंके


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या अपेक्षा फार मोठ्या नसतात, त्यांना दैनंदिन जीवन जगताना आवश्यक असलेली कामे किरकोळ स्वरुपाची असतात. मात्र या किरकोळ कामांमुळेही त्यांना मोठा आधार मिळत असतो.त्यामुळेच हे विस्तारित समाधान योजना शिबीर येथे आयोजित केले असून प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तांत्रिक अडचणींवर उपाय शोधत गोरगरीब जनतेची कामे करावीत असे आवाहन आ.निलेश लंके यांनी केले.

नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनातर्फे महा राजस्व अभियानाअंतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी आ.लंके बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार शिल्पा पाटील, तालुका दुध संघाचे संचालक राजाराम धामणे, गोराभाऊ काळे, शिक्षकनेते संजय धामणे, पंचायत समिती सदस्य रविंद्र कडूस, सरपंच आरती कडूस, बाजार समितीचे निरीक्षक संजय काळे, बापूराव धामणे, नानासाहेब कडूस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.लंके म्हणाले, शासन आपल्या दारी हा उपक्रम फक्त नावालाच न राहता तो यशस्वीपणे राबविण्यासाठी या पुढील काळात आपण प्रयत्नशील राहणार आहोत, गावातील प्रश्न गावातच सुटले पाहिजेत, त्यासाठी चांगले युवक कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, त्या माध्यमातून दर २ – ३ महिन्यातून अशी शिबिरे आयोजित करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, शिक्षक नेते संजय धामणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात उपसरपंच जयप्रकाश पाटील यांनी या शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

या शिबिरात तलाठी कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत तसेच आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, बँक ऑफ महाराष्ट्र, ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अशा विविध शासकीय कार्यालयांच्या अखत्यारीत येत असलेल्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

रेशन कार्ड, आधार कार्ड काढणे, मतदार यादीबाबतची कामे, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलिअर, डोमासाईल, शैक्षणिक कामासाठी आवश्यक विविध दाखले, शासकीय अनुदानासाठी अर्ज भरणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, अपंगांसाठीच्या योजना, वयोवृद्ध नागरिकांचे वयाचे दाखले, आदी कामे करण्यात आली. जालिंदर बोरुडे यांच्या फिनिक्स फौंडेशन व के.के.आय. बुधराणी हॉस्पिटलच्या पथकाने नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली. ज्यांची संजय गांधी, श्रावण बाळ, मातृवंदना, बालसंगोपन योजनेची प्रकारने मंजूर झाली आहेत त्यांना खाते पुस्तिका व मंजुरी पत्रांचे तसेच मंजूर अनुदानाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपसरपंच जयप्रकाश पाटील, शिक्षकनेते संजय धामणे, संजय काळे, सुनिल हारदे, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, नामदेव काळे, सौ. शीलाताई कडूस, स्वाती निलेश धामणे, सुमन काळे, मनीषा कडूस, शुभांगी विठ्ठल काळे, नितीन साळवे, संजय पाटील, सतीश कडूस, आयेशा मुस्ताक शेख, सुभाष धामणे, राजेंद्र कडूस, बाबासाहेब धामणे, गणेश काळे, नानाभाऊ कडूस, रावसाहेब वाव्हळ,अमोल वाव्हळ, ग्रामसेवक टी.के.जाधव यांच्यासह गावातील शिक्षक अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शहाजान तांबोळी यांनी केले. तर आभार प्रा. लतिफ शेख यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post