महापालिकेच्या घरकुल योजनेचे लाभार्थी मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित


संतप्त झालेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महापालिकेने केंद्र सरकारच्या निधीतून उभारलेल्या घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांना महापालिकेने घरकुले तर दिली मात्र कुठल्याही मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन न दिल्यामुळे या लाभार्थी नागरिकांना अतिशय हालाकीत जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच आ. संग्राम जगताप यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.

महापालिकेने केंद्र शासनाच्या योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तसेच झोपडपट्टीतील रहिवाश्यांसाठी पक्की घरे बांधून दिली आहेत. तसेच महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकूल योजनेत घरकुले बांधून दिली आहेत. गेल्या 2 वर्षांपासून सुमारे 300 ते 400 कर्मचारी या घरकुल प्रकल्पात राहतात. मात्र, त्यांना महापालिकेकडून कुठल्याही मुलभूत सोयी-सुविधा पुरवल्या जात नाहीत. पिण्याचे पाणी 10 ते 12 दिवसातून मिळते. दिवाबत्तीची सोय नाही. सेप्टीक टँक नाहीत त्यामुळे संपूर्ण शहराचे आरोग्य सांभाळणार्‍या कर्मचार्‍यांच्याच कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेकदा महापालिका प्रशासनाला निवेदने दिली. तरीही कुठलीही कारवाई नाही. त्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना अतिशय हालाकीत जीवन जगावे लागत आहे. याच्या निषेधार्थ या कर्मचार्‍यांनी महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

तसेच आपल्या या व्यथा आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरही मांडल्या. महापालिका प्रशासनाने तातडीने मुलभूत सुविधा पुरविल्या नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचार्‍यांनी दिला आहे.

यावेळी संतोष ठोकळ, राधाजी सोनवणे, सुरेश उमाप, अशोक गायकवाड, राजू पठारे, पोपट लोखंडे, एकनाथ नन्नवरे, चंद्रकांत वाघमारे, शरद राजगुरू, उषा साळवे, मिरा रोकडे, लक्ष्मी शिंदे, मनिषा शिंदे, नंदा पवार, रेणुका शिंदे, जनार्दन घाटविसावे, मधुकर साळवे, रेखा गायकवाड, मीरा उघडे, नंदा ठोंबे, सुशिला खरात, आशा बागवान, आशाबाई कसबे, वर्षा कांबळे, मंदा ठोंबे, लता शिंदे, मीनाज मदारी, पूजा घाटविसावे, नबिशा मदारी, अकसाना मदारी, सुलताना मदारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post