'विराट'ने 'माहि'ला टाकले मागे


माय अहमदनगर वेब टीम
हॅमिल्टन: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीने देखील एक विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवला. रोहितने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार केला. त्या पाठोपाठ विराटने देखील एक विक्रम केला.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विराटने २५वी धावा घेत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला मागे टाकले. टी-२०मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट चौथ्या स्थानावर होता. धोनीने कर्णधार म्हणून १ हजार ११२ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत धोनी तिसऱ्या स्थानावर होता. या यादीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन १ हजार १४८ धावांसह दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिस १ हजार २७३ धावांसह पहिल्या स्थानावर आहे.

विराटने तिसऱ्या सामन्यात २५ धावा करत टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला. तर क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाचा कर्णधार झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यातील पहिला टी-२० सामना भारताने ६ विकेटनी तर दुसरा सामना ७ विकेटनी जिंकला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post