देशातून आलेल्या खेळाडूंनी अहमदनगरमध्ये धरला झिंगाटवर ठेका
खेळाडूंचा थकवा घालवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - गेल्या तीन दिवसापासून वाडियापार्क येथे बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत देशातून 36 राज्यांमधून सहाशे खेळाडू सहभागी झाली आहेत. गेल्या तीन दिवसापासून अत्यंत चुरशी चे सामने येथे रंगले. खेळाच्या ताणतणावात असलेल्या खेळाडू तणावमुक्त व्हावेत यासाठी जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. खेळामधला थकवा घालवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात पुण्याच्या अंध कलाकारांनी सदर केलेल्या सूर सागर ऑर्केस्ट्रात अनेक जुन्या नव्या हिंदी- मराठी गीते सदर करून उपस्थितांची माने जिंकली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सुनीलजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमास जिल्हा कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, न्यायाधीश एस. एस. पाटील, स्नेहालय चे संचालक सुवालाल शिंगवी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू होण्या अगोदर विविध राज्यातील मुला मुलींनी विविध गाण्यांवर ठेका धरला.
पुण्याच्या कलाकारांनी अंध कलाकारांनी सादर केलेले जुन्या-नव्या हिंदी मराठी गाण्यांना उपस्थित खेळाडूंनी भरभरून दाद दिली. तसेच कार्यक्रम सुरू होण्याआधी डीजेवर नृत्य करण्याचा मोह खेळाडूंना आवरला नाही. देशातून विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंनीही मराठी झिंगाट गाण्यावर ठेका धरला.