राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने पटकावले सांघिक विजेतेपद


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- वाडिया पार्क मैदानावर सुरू असलेल्या 19 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी सांघिक क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीचे सामने रंगले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात बॅडमिंटन खेळाचाचा थरार नगरकरांनी अनुभवला. राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कर्नाटक संघावर मात करीत सांघिक विजेतेपद पटकावले आहे. रविवारी अंतिम फेरीत झालेल्या चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकवर २ -१ असा विजय मिळवला तर मुलींच्या सांघिक अंतिम सामन्यात डीएव्ही कॉलेजच्या संघाने दिल्लीवर २ -० अश्या सेटमध्ये मात करत विजय मिळवला. उपांत्य फेरीतच महाराष्ट्राच्या संघाचा पराभव झाला .

अंतिम फेरीत महाराष्ट्रातील मुलांच्या संघांमध्ये रोहन थूल व कर्नाटकच्या बी.एस. वैभव यांच्यात अंतिम फेरी झाली. यात रोहोन ने वैभव 7- 21, 21- 19, 21- 17 अशा गुणांनी मात केली. दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या तनिष्क सक्सेना याने कर्नाटकच्या सी.एस. साकेत याच्यावर 21 -19, 21 -11 अशा गुणांनी मोठा विजय मिळवून सरळ सेटमध्ये सामना जिंकला. अंतिम दुहेरी सामन्यात मात्र कर्नाटकने महाराष्ट्रावर १४-२१,२०-२२ अशा गुणांनी विजय मिळवला. दुहेरी सामन्यात महाराष्ट्राला पराभव पत्करावा लागला त्यामुळे तीन पैकी दोन सामने जिंकणाऱ्या महाराष्ट्राला सुवर्ण पदक तर कर्नाटकला रौप्यपदक मिळाले आहे. तीसऱ्यासाठी तामिळनाडूने बिहारवर मात करत कांस्यपदक पटकावले.

मुलींच्या झालेल्या अंतिम सामन्यात डीएव्ही कॉलेजसंघ व दिल्लीमध्ये झालेले सामने रंगले. एकेरी सामन्यात डीएव्हीच्या दीपशिखा सिंगने दिल्लीच्या दुर्वा गुप्ता वर 21- 11, 18 -21, 21 -11 अशा विजय मिळवला. दुहेरीत दीपशिका सिंग व निकिता श्रीवास्तव जोडीने दिल्लीच्या अध्या पाराशर व दुर्वा गुप्त जोडीवर 21 -13, 21 -14 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. मुलींचा अंतिम सामना ही अत्यंत चुरशीचा झाला. डीएव्ही संघाने दिल्लीवर 2-0 असा मोठा विजय मिळवून सुवर्णपदक कमावले. दिल्लीला रौप्यपदक तर राजस्थानला कांस्यपदक मिळाले.

महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यात मुलांचा झालेला अंतिम सामना पाण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे हे सुरूवातीपासून उपस्थित होते. महाराष्ट्राच्या संघाने हा सामना जिंकल्यानंतर त्यांनी खेळाडूंचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील सामन्यातही आधी चांगला खेळ करावा अशा शुभेच्छा दिल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post