केडगावमध्ये पतंग महोत्सवात चिमुकल्यांची धमाल


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर केडगावच्या लोंढे मळा येथील शिवम्‌ ग्लोबल स्कूलमध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पतंग महोत्सवात संगीताच्या तालावर चिमुकल्यांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटीत धमाल केली.

पतंग महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका श्रेया लोंढे व गौरव लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष लोंढे, संचालक सौरभ लोंढे, शुभम लोंढे उपस्थित होते. प्राचार्य नंदकुमार शेजूळ यांच्या संकल्पनेतून हा पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला. शाळेच्या आवारात सकाळी १० ते १२ या वेळेत झालेल्या या पतंग महोत्सवात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पतंग कसा उडवावा याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही उत्साहाच्या वातावरणात पतंग उडविण्याचा आनंद लुटला. शाळेच्यावतीने भारतीय संस्कृतीतील सर्व सण-उत्सवांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी प्रत्येक सण-उत्सवानिमित्त कार्यक‘म आयोजित करुन त्या त्या उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना करुन दिली जाते. याचाच एक भाग म्हणून मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हा पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला. या पतंग महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नंदकुमार शेजूळ, शिक्षिका पूजा दळवी, मयुरी कुलकर्णी, वर्षा मंदिलकर, अश्विनी हारदे, निलीमा ढाके, राजश्री यादवाडकर, संगीता देशमुख, राजू गोफणे आदींनी परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post