तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- राज्यातील कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची परत एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे आता नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपद सांभाळणार आहेत. महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदलीचा सपाटा लावला आहे.

उद्धव ठाकरे सरकारमध्ये परत एकदा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय आहे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या ताब्यातील नागपूर महापालिकेची. कारण नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी नवी मुंबई नाशिक महापालिका अशा ठिकाणी मुंडे यांची नियुक्ती कायम चर्चेचा विषय होता. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुंढे यांच्यातील संघर्षामुळे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात ते चर्चेत राहिले होते. त्यानंतर मुंढे यांना साइड पोस्टिंग म्हणून असलेली एड्स नियंत्रण सोसायटी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. आता परत मुंढे यांना फडणीस यांच्या ताब्यात असणार्‍या नागपूर महापालिकेत जबाबदारी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय खेळी केल्याचे बोलले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post