मारहाण करून 10 लाखांची फसवणूक


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – चौघांनी संगनमत करुन एकाची सुमारे 10 लाखांची फसवणुक केल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ही फसवणुक सन 2007 ते 29 एप्रिल 2019 या दरम्यान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सत्यदेवसिंह आत्माराम राठोड (वय 55, रा. ओमकार अपार्टमेंट, बालिकाश्रम रोड, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, राजु आत्माराम आहुजा (रा. प्लॉट नं. 11, प्रभात कॉलनी, गुलमोहोर रोड, नगर) यांनी सत्यदेवसिंह यांची 4 लाख 9 हजार 70 रूपयांची फसवणुक केली. तसेच त्याचे अन्य साथीदार सादिक चंदु पठाण (रा. नवलेनगर, गजानन हौसिंग सोसायटी, गुलमोहोर रोड), इम्रान सलीम शेख (रा. ईदगाह मैदानाजवळ), इशरार उर्फ टकलु शेख (रा. कोठला झोपडपट्टी) यांनी सत्यदेवसिंह यांच्या हाताला सिगारेटचे चटके देवून मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना दुसर्‍या ठिकाणी राहण्यास परावृत्त केले. त्यांच्याकडुन आणखी 6 लाख रूपये घेतले. अशाप्रकारे एकूण 10 लाख 9 हजार 70 रूपयांची सत्यदेवसिंह यांची फसवणुक केली.




याप्रकरणी सत्यदेवसिंह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420, 406, 506, 323, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरसे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post