न्यायालयात वकिलास खुर्चीने मारहाण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- खुर्चीवर बसण्याच्या कारणावरुन वाद करुन एका पक्षकाराने चक्क वकिलासच शिवीगाळ व दमदाटी करीत खुर्चीने मारहाण केली. ही घटना न्यायालयाच्या नवीन इमारतीमधील बार रुम नं.1 मध्ये मंगळवारी (दि.7) दुपारी घडली.

न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या आवारात असलेल्या बार रुममध्ये वकील आपल्या अशिलांशी वार्तालाप करुन दाव्याची माहिती घेतात. आज दुपारी नगर न्यायालयातील अॅड. शेख हे आपल्या अशिलाबरोबर बोलण्यासाठी बार रुम नं.1 मध्ये गेले असता तेथे वकिलांना बसायला जागा नसल्याने खुर्चीत बसलेल्या एका पक्षकारास त्यांनी बसण्यासाठी खुर्ची मागीतली असता त्याचा राग येवून त्याने वकीलांशी अरेरावीची भाषा करीत वाद घातला व त्यातून खुर्ची उचलून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात अॅड. शेख हे जखमी झाले.




याप्रकरणी अॅड. शेख यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याकडे धाव घेतली असता भिंगार पोलिसांनी अॅड.शेख यांना प्रथम औषधोपचाराकरीता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. याबाबत दुपारी उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post