'जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही'


माय अहमदनगर वेब टीम
पुणे- भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या वादग्रस्त पुस्तकाने राज्यातील राजकारण चांलेच तापले. त्यानंतर भाजपने पुस्तक मागे घेतले. या दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी भाजपला आणि शिवाजी महाराजांच्यां वंशजांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर आज माजी खासदार उदयनराजे भासले यांनी पत्रकार परिषद घेऊन जय भगवान गोयलसह राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेवरही हल्ला चढवला.

यावेळी उदयनराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांना संपूर्ण जग आदर्श म्हणून पाहतं. शिवरायांची तुलना अनेकवेळा झाली, लोकांनी बुद्धी गहाण ठेवलीय का माहित नाही, काल-परवाचे पुस्तक पाहून वाईट वाटले. गोयल नावाच्या लेखकाने नरेंद्र मोदींची तुलना छत्रपतींशी केली. महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात, मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी राजा आहे, असे म्हणत उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरही निशाणा साधला.

काय म्हणाले उदयनराजे?
"सर्वात आधी मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आज पानिपतचा शौर्य दिवस आहे, या युद्धात जे कामी आले त्यांना श्रद्धांजली वाहतो. ही पत्रकार परिषद घेण्यामागे कोणतेही राजकारण नाही, मी कधी राजकारण केलेच नाही आणि करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबरही केली जाते आहे, याचे वाईट वाटते. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही. एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले ज्यांची प्रतिमा आपण देवघरात ठेवतो. तुलना तर सोडून द्या पण महाराजांच्या जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचे आत्मचरित्र वाचतो, त्यानंतर त्यांच्यासारखे वागायचा प्रयत्न करतो, म्हणून आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही. मी राजघराण्यात जन्माला आलो हे माझं सौभाग्य समजतो. आम्ही महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. राजेशाही संपल्यावर आम्ही लोकशाही मान्य केलं. सर्व धर्मसमभाव ही कल्पना कुठे गेलीस," असा हल्लाबोल उदयनराजे भोसलेंनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post