दिल्लीचा शैक्षणिक फॉर्म्युला आता महाराष्ट्रात


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्र सरकार सुद्धा शिक्षणाचा दर्जा सुधरवण्यासाठी दिल्ली स्कूलचा फॉर्मुला वापरणार आहे. हे दिल्ली मॉडेल राज्यातील महापालिका अंतर्गत चालणाऱ्या शाळांमध्ये वापरले जाईल असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. त्याच बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. हा फॉर्म्युला मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबईत लागू केला जाईल.

राज्यातील शालेय शिक्षणाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयाची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अजित पवार म्हणाले, "दिल्लीचे शैक्षणिक धोरण देशातील सर्वोत्कृष्ट मॉडेल आहे. दिल्लीतील शाळांमध्ये लागू झालेल्या या मॉडेलला बारकाइने पाहणे आणि महाराष्ट्रातील शिक्षणाचा गर्जा सुधरवण्यासाठी लागू करणे गरजेचे आहे." दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सरकारी शाळांचा कायापालट करून शिक्षणाचा दर्जा सुधरवला. तसेच खासगी शाळांना देखील मात दिली. या शैक्षणिक धोरणाचे देशभरातून कौतुक केले जाते. त्यासंदर्भातच उप-मुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.


अजित पवार पुढे म्हणाले, "दिल्लीचे शैक्षणिक मॉडेल आर्थिक व्यवस्थापनासह शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सुद्धा फायद्याचे आहे. महाराष्ट्र सरकार शिक्षणाला प्राधान्य देणार आहे. कुटुंबाची पार्श्वभूमी काहीही असो सर्वांना दर्जेदार शिक्षण घेण्याचा हक्क आहे. आणि महाराष्ट्र सरकार हा एजंडा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सुरुवातीला दिल्ली शाळांचा फॉर्म्युला काही मोजक्याच शहरांमध्ये लागू केला जाणार आहे. यानंतर संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल. एवढेच नव्हे, तर मुंबई महापालिकेला दिल्लीतील शाळांचा अभ्यास करून एक प्लॅन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post