अहमदनगर भाजपमध्ये खांदेपालट ; शहर जिल्हाधक्षपदी भैया गंधे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : भारतीय जनता पार्टीच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र उर्फ भैया गंधे, नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अरुण मुंडे तर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या बाबतची घोषणा पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी आज केली आहे.

नगर येथे तीन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाकरता 39 इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरिभाऊ बागडे यांनी काम पाहिले होते. आजी, माजी जिल्हाध्यक्ष सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे ठाकले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीने नगर जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपदाची नगर व दक्षिण अशी विभागणी केली आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी शहराध्यक्षपद स्वतंत्र आहे. ग्रामीण भागाकडे दोन जिल्हाध्यक्ष यावेळेला पक्षाने दिले आहेत. महेंद्र उर्फ भैय्या गंधे हे विद्यमान नगरसेवक असून अरुण मुंढे हे भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. दरम्यान, निवडीबद्दल भैय्या गंधे यांचा खासदार सुजय विखे व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते महापालिकेत सत्कार करण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post