माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – श्रीसमर्थ रामदास स्वामी पादुका प्रचार दौऱ्या निमित्त सावेडीच्या जॉगिंग त्र्याकवर प्रसिध्द गायक व संगीतकार श्रीधर फडके यांच्या श्रुश्राव्य गीतरामायणाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित हजारो श्रोते या कार्यक्रमात मंत्र्मुध झाले.या कार्यक्रमामुळे नगरकरांना ६४ वर्षापूर्वी आकाशवाणीवर होणार्या गदिमा व बाबूजींच्या झालेल्या गीतरामायानाच्या स्मृती जागवली.
प्रारंभी व्यासपीठावर श्रीसमर्थ रामदासांच्या पदुकाचे आगमन होताच उच्च स्वरात जयजय राघवीर समर्थ... असा गजर झाला. रामदास स्वामी संस्थांनचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, मंदारबुवा रामदासी, श्रीधर फडके, डॉ.एस.एस.दीपक , सुनील रामदासी,वाल्मिक कुलकणी यांच्या हस्ते दीपप्रज्वल झाले.
यावेळी नरेंद्र कुलकर्णी, मुकुल गंधे, राजाभाऊ पोतदार, अशोक जगताप, मिलिंद चवंडके, समीर उपाध्ये आदींसह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
स्वये श्रीराम प्रभू ऐकती ... या गीताने गीत रामायणाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर दशरथा घे हे पायास दान, या नंतर झालेल्या राम जन्मला ग सखे राम जन्माला या गाण्यावर सर्वांनी ताल धरत सामुहिक साथ दिली. तसेच स्वयंवर झाले सिताचे हे गीत राम सीता स्वयंवराचे मंगल सोहळा श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभा करणारा ठरला. नकोस नौके परत फिरू.... गेगीत गाताना त्यांनी जय गंगे जय भागोर्थी या कोरसची साथ सांगत करत ध्यानात अनुभवली. उत्तराउत्तर हा कार्यक्रम रंगतच गेला. चांगलीच थंडीतही मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.
Post a Comment