भाजपाची माघार, 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक मागे घेण्याचे आदेश


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या 'आजके शिवाजी, नरेंद्र मोदी' पुस्तकावरून सुरू झालेला वाद चांगलाच वाढला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरून भाजपवर टीकास्त्र केले. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली तसेच, जय भगवान गोयल यांच्या फोटोला चपलेने मारणे आणि काळे फासण्यासारखेप्रकारही घडले. त्यानंतर आता भाजपने पुस्तक मागे घेण्याचे ठरवले आहे. भाजप नेते श्याम जाजू यांनी प्रकाशकांना पुस्तक मागे घेण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या "आज के शिवाजी नरेंद्र मोदी" या पुस्तकावरुन राज्यात राजकारण चांगलेच तापले.भाजपवर सर्वत्र टीका होत आहे. यातच पुस्तकाचे लेखक म्हणजेच जय भगवान गोयल यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. " प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे आणि लिहीण्याचे स्वातंत्र्य आहे.शिवाजी महाराजांचा मीही सन्मान करतो. महाराजांच्या वंशजांनीही आणि इतर लोकांनी हे पुस्तक वाचावे, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील," असे मत गोयल यांनी व्यक्त केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post