वाडियापार्क येथे मॉर्निंग ग्रुप व फुटबॉल क्लब यांच्या पुढाकारातून उपक्रम
माय अहमदनगर वेब टीम - नगर शहरातील युवकांनी एकत्र येवुन स्वच्छ, सुंदर व हरित नगर शहर करण्यासाठी एकसंघ होणार आहे. विविध सामाजिक संघटना, क्रिडा संघटना, सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करणार आहे. स्थायी समितीचे माजी सभापती मनेष साठे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडियापार्क येथे मॉर्निंग ग्रुप व फुटबॉल क्लब याच्या पुढाकारातून नगर शहरामध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम करणार आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनेष साठे यांच्या वाढदिवसानिमित्त मॉर्निंग ग्रुप व फुटबॉल क्लब यांच्यावतीने नगर शहरामध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अविनाश घुले, सुभाष झिने, पै.अनिल गुंजाळ, गणेश गोंडाळ, भारत पवार, अनिल येसमाने, बाबा गाडळकर, भाऊसाहेब पांडुळे, दत्ता गाडळकर, राजेंद्र ससे, संतोष ढोंबळे, मिलिंद भालसिंग, सुभाष काळे, अमित तवले, सारंग उदावंत, संदीप पडोळे, तुषार कपाले, संतोष गाडे, प्रशांत निघोजकर, भाऊ मुदगल, सागर पालवे आदी उपस्थित होते.
यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले म्हणाले की, मनेष साठे यांचे सर्व पक्षामधील नेत्यांशी संबंध आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून नगर शहर स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम आम्ही सर्वांनी केले आहे.
स्वच्छतेच्या कामासाठी आम्ही सर्वजण पक्ष संघटना बाजूला ठेवून मनेष साठे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये स्वच्छतेचे काम करणार आहे असे ते म्हणाले.
यावेळी मनेष साठे म्हणाले की, नागरिकाच्या दृष्टीने स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी नगर शहर स्वच्छ होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे. स्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहते यासाठी स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे.
Post a Comment