माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली: उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला हजारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा ठोठावताना कोर्टाने सेंगर याला पीडितेला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत.
सेंगरला आधीच भाजपमधून काढून टाकण्या आले आहे. 2017 मध्ये कुलदीप आणि त्याच्या साथीदारांनी उन्नावमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता. जुलै 2019 मध्ये पीडितेच्या कारचा अॅक्सीडेंट झाला होता, त्यातही सेंगर आरोपी होता, पण त्याला क्लीनचीट देण्यात आली होती.
कोर्टाने सांगितले की, सेंगर एक लोकप्रतिनिधी होता, तरीदेखील त्याने नागरिकांचा विश्वास तोडला. न्यायालाने पीडितेला 10 लाख रुपयांच्या मदतीचे आदेश दिले आहेत. दोषी सेंगरला आकारण्यात आलेला दंड त्याला एका महिन्याच्या आत भरावा लागेल.
Post a Comment