सिंचन घोटाळ्यात अजित पवार पूर्णपणे निर्दोष


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरील सिंचन घोटाळ्याचे आरोप आता पूर्णपणे धुतले गेले आहेत. 70 हजार कोटी रुपयांच्या कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवारांना पूर्ण क्लीन चिट दिली आहे. एसीबीने उच्च न्यायालयात यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर केले. यापूर्वीच एसीबीने सिंचन घोटाळ्याशी संबंधित उघड चौकशीची नऊ प्रकरणे बंद करण्यास मंजुरी दिली होती.

1999 ते 2009 दरम्यान, राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये 35 हजार कोटींची अनियमितता असल्याची बाब समोर आली. फेब्रुवारी 2012 मध्ये तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करुन सिंचन विभागात गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले होते. 2012 मध्ये जनमंच या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करून राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, सीबीआय चौकशीची मागणी केली.

फौजदारी अनियमितता आढळली नाही : एसीबी
एसीबीने सांगितले, या 9 प्रकरणांत फौजदारी अनियमितता कुठलीही आढळून आली नसल्याने 4-5 महिन्यांपूर्वीच ती चौकशी बंद करण्याचा प्रस्ताव अमरावती एसीबीने दिला. विदर्भ पाटबंधारे महामंडळातील 45 प्रकल्पांशी संबंधित 2654 निविदांची चौकशी एसीबी करत होती. 212 निविदांची खुली चौकशी पूर्ण झाली. 24 प्रकरणांत एफआयआर, तर 5 प्रकरणांत दोषारोप दाखल आहेत. मात्र, 45 निविदांच्या चौकशीत अनियमितता आढळून न आल्याने ती प्रकरणे बंद केली. या प्रकरणात अजित पवारांचा संबंध नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post