12 डिसेंबरला पंकजा मुंडे मोठा राजकीय भूकंप घडवणार..? फेसबुक पोस्टनंतर ट्विटरवरून हटवला भाजपचा उल्लेख
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे लवकरच राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपचा उल्लेख काढून टाकला आहे, त्यामुळे राज्यातील राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. याआधी पंकजा मुंडेंच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असं होतं. पण आता ट्विटरवर पेजवर फक्त @Pankajamunde लिहलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची सध्या चर्चा आहे. खरंतर, पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. यातच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली.
12 डिसेंबरला भाजप दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस आहे. त्याच दिवशी आपली पुढची वाटचाल जाहीर करणार असल्याचे पंकजा मुंडेंनी फेसबूक पोस्टद्वारे म्हटले आहे. कार्यकर्त्यांना मला बोलायचं आहे आणि मलाही कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे. मात्र सध्या मला शांतता पाहिजे आहे. मला माझ्याशी संवाद साधायचा आहे. हा संवाद झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी करायची हे ठरवायचं आहे असं त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून म्हटलं. या सर्वामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून वेगळी वाट धरणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
Post a Comment