निर्भयाः मी दोषींना फाशी देते; रक्ताने लिहिले पत्र


माय अहमदनगर वेब टीम
लखनऊ - निर्भया प्रकरणातील आरोपींना मला फासावर लटकवायचे आहे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे वर्तिका सिंह यांनी अमित शहा यांना साद घातली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपी सध्या तिहार कारागृहात असून, या चौघांना एकत्र फाशी देण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या चारही आरोपींना महिलेकरवी फासावर लटकवण्यात यावे. यासाठी मी तयार आहे. महिलेच्या हातून फाशी दिल्यामुळे संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल. एक महिला फाशीही देऊ शकते, ही बाब त्यातून अधोरेखित होईल, असे वर्तिका सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post