नागरिकत्व कायद्यात होणार बदल?; यांनी दिले संकेत
माय अहमदनगर वेब टीम
गिरिडीह (झारखंड) - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आणि त्यानंतर त्याचे झालेल्या कायद्यातील रुपांतरावरून देशभरात विशेषत: ईशान्य भारतात उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या कायद्यात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. झारखंडमधील गिरिडीह येथे एका निवडणूक सभेत संबोधित करताना शहा यांनी हे संकेत दिले आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या कायद्यात बदल करावेत असे आपल्याला सांगितल्याचे अमित शहा यांनी सभेत बोलताना सांगितले. संगमा यांना ख्रिसमसनंतर आपली भेट घ्यावी असेही सांगितल्याचे शहा म्हणाले. मेघालयसाठी सर्जनशील पद्धतीने काही उपाय करू शकतो का याचा विचार केला जाऊ शकतो असे शहा म्हणाले. कुणालाही या कायद्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचेही शहा म्हणाले.
या पूर्वी लोकांच्या संरक्षणासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे वक्तल्य मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले. शाह यांचे नागरिकत्व कायद्यावरील हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नागरिकत्व कायद्याची आमच्या राज्यात अंमलबजावणी करणार नाही, असे पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
Post a Comment