माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- स्वास्थ्य व निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी व दि.2 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या हाफ मॅरेथॉनच्या प्रोमो रन साठी इंडियन डेंटल असोसिएशन अहमदनगर शाखा व नगर रायझिंग आयोजित मिनी मॅरेथॉन रविवारी (दि.15 डिसेंबर) उत्साहात पार पडली.
जीवनात वाढते ताण-तणाव, आरोग्याचे प्रश्न गंभीर बनत असताना शहरात आरोग्य चळवळ रुजविण्यासाठी नगर रायझिंगच्या वतीने मॅरेथॉनच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. शहरात नगर रायझिंग फाऊंडेशनच्या वतीने फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या संकल्पनेतून सलग सहाव्या वर्षी मॅक्सिमस नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मुख्य स्पर्धेच्या प्रोमो रनसाठी या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे कडाक्याच्या थंडीत या मिनी मॅरेथॉनचा प्रारंभ सावेडी जॉगिंग ट्रॅक येथून झाला. अबालवृध्दांसह युवक-युवती व महिला अत्यंत उत्साह व जोशपुर्णपणे धावल्या. यावेळी इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विवेकानंद चेडे, सचिव डॉ.ओमकार भालसिंग, डॉ.विनोद मोरे, डॉ.भाऊसाहेब लांडे, डॉ.ओमकार कुलकर्णी, नगर रायझिंगचे संदिप जोशी, अतुल डागा, जगदिप मक्कर, योगेश खरपुडे, दिनेश भाटीया, अॅड.गौरव मिरीकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी संगीताच्या तालावर रनर्सकडून व्यायाम करुन घेण्यात आला. ही मॅरेथॉन 3, 5 व 10 कि.मी. या तीन गटात संपन्न झाली. या मिनी मॅरेथॉन नगरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा समारोप गंगा उद्यान येथे झाला. मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी महेश गोपाळकृष्णन, अमित अंदोत्रा, गौतम जायभाय, हेमंत लहाडे, धनेश खत्ती, जितेश माखीजा, दिपक पापडेजा, किशोर फिरोदिया, राहुल ओझा, प्रियंका मराठे, प्रेरणा आडसुरे, सारिका गाडे, शाम वाघुंबरे, शेखर आंधळे, किशोर टकले, एस.एम. मोरे आदींसह नगर रायझिंगच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. दि.2 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या हाफ मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन नगर रायझिंगच्या वतीने करण्यात आले.
Post a Comment