ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पावसेे


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पावसे यांची तर व्हाईस चेअरमनपदी नारायण घेरडे यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी बी.बी.सिनारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हि निवड करण्यात आली. या निवडीनंतर दोन्ही नूतन पदाधिकार्‍यांचा संस्थेचे मानद सचिव तथा ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक विलास काकडे, विशाल काळे, रामदास डुबे, सुनिल नागरे, रमेश बांगर, मंगेश पुंड, अशोक नरसाळे, संजय घुगे, नवनाथ पाखरे, एकनाथ आंधळे, अभय सोनवणे, रखमाजी लांडे, विजयकुमार बनाते, महेश जगताप, सचिन मोकाशी, धर्माजी फोफसे, रोहिणी नवले, शितल पेरणे-खाडे, संस्थेचे सेके्रटरी प्रदीप कल्याणकर, नफीसखान पठाण, सभासद अंकुश वेताळ, मिखाईल गायकवाड, सुभाष गर्जे, सुरेश मंडलीक, राजेंद्र मेहेत्रे, सुनिल वाघ , शहाजी नरसाळे, जालिंदर कोठुळे, बाप्पूसाहेब चेडे, युवराज पाटील, आसाराम कपिले,विठ्ठल आव्हाड, बाबासाहेब महाजन आदी उपस्थित होते.

राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था राज्यातील आदर्श पतसंस्था म्हणून ओळखली जाते. सभासदहिताला प्राधान्य देणारे निर्णय घेवून त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यावर संस्थेने नेहमीच भर दिला आहे. संस्था सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून यानिमित्त भव्यदिव्य कार्यक्रम घेवून सभासदांना आकर्षक भेट देण्यात आली. संस्थेकडून सभासदांना 15 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. दहा लाखांचा अपघाती विमाही उतरवण्यात आला आहे. सातत्याने ऑडिट अ वर्ग मिळत असून 24 तासांत कर्ज उपलब्ध करून देत सर्वात जलद सेवा देण्याचे काम संस्थेमार्फत होत असते.

नूतन चेअरमन राजेंद्र पावसे म्हणाले की, आपण महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 चा क्रियाशील सभासद म्हणून काम करीत आहे. ग्रामसेवकांच्या पतसंस्थेला मोठी प्रतिष्ठा व परंपरा असून ती जपण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न राहणार असून सर्व संचालकांना बरोबर घेवून सुसंवादातून कामकाज चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post