साडेनऊ लाखाचे सोयाबीन गायब ; गुन्हा दाखल



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगरच्या मार्केट यार्ड येथून धुळे येथे घेऊन जाण्यासाठी भरलेले 230 क्विंटल सोयाबीन ट्रक चालकाने गायब केले आहे. तब्बल साडेनऊ लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ट्रक चालक मुकेश कुमार (रा. सैंदवा, मध्यप्रदेश) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केट यार्डमधील व्यापारी भगवानदास मुळचंद गुगळे (रा. कानडे मळा, सारसनगर) यांनी 23 नोब्हेबरला सायंकाळी पाच वाजता धुळे येथे पोहच करण्यासाठी ट्रकमध्ये (क्र एमपी- 09 एएच- 9919) नऊ लाख 51 हजार 717 रूपयांचे 230 क्विंटल सोयाबीन भरून दिले होते. ट्रक चालक मुकेश कुमारला हा माल धुळे येथील महाराष्ट्र ऑईल अ‍ॅट्रॅक्शन या कंपनीला पोहच करण्यास सांगितला होता. ट्रकचालक मार्केट यार्ड येथून सोयाबीन घेऊन निघाला परंतू ते धुळे येथे पोहच करण्याऐवजी त्याने परस्पर गायब केले. व्यापारी गुगळे यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक मुकेश कुमारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ हे करत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post