येत्या काही दिवसात राज्यात जोरदार पावसाची शक्यता!



माय अहमदनगर वेब टीम
गोवा - मागील तीन ते चार दिवसांपासून अरबी समुद्रातील वातावरणात झालेल्या बदलांमध्ये नव्याने भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळी ढग पुन्हा एकत्र येऊन त्याचे आता कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर होत होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील तीन चार दिवसांमध्ये राज्यात जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचे पुढे चक्रीवादळातही रूपांतर होऊ शकते. राज्यात २ ते ४ डिसेंबर दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हिवाळ्यामध्ये वातावरण बदलाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. हवामान बदलाचा फटक्यामुळे घसा खवखवणे व कोरडी सर्दी होऊन आतल्या आत होणारे त्रास यामुळे ताप येणे वगैरे प्रकार सध्या होत आहेत. ग्रामीण भागात पहाटे थंड वातावरण व मध्यरात्रीपर्यंत थोडाफार उकाडा तर सायंकाळी असह्य उकाडा यातून आरोग्यावर परिणाम होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post