अक्षर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला सुरुवात


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - येथील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अक्षर विचार प्रतिष्ठान,आयोजित ए वन बायोटेक प्रा.ली. व तिस्ता बाथ सोप प्रायोजीत अक्षर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा दिमाखदार उदघाटन सोहळा गुरुवार दि. 19 डिसेंबर रोजी शहरातील नटसम्राट डॉ. श्रीराम लागू नाट्यनगरी, माऊली सभागृह येथे संपन्न झाला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी महापौर बाबासाहेब वाकळे, उदघाटक सिने- नाट्य दिग्दर्शक संकेत पावसे, तर प्रमुख पाहुणे जेष्ठ नाट्यकर्मी आयुब खान, बारकू सुपेकर, स्वप्नील मुनोत, नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाष चंद्र मिश्रा, मल्लेश नल्ला उपस्थित होते.

अक्षर विचार प्रतिष्ठान चे अध्यक्ष बलभीम पठारे यांनी मान्यवरांचे स्वागत सत्कार केले. "तरुणांचा उत्साह आणि कला अविष्कार हा समाजाला प्रबोधन करणारा असावा" असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले, चित्रपट माध्यम प्रभावी तर रंगमंच माध्यम हे प्रेरक असते. माध्यमात कितीही मोठे झालोत तरी ही रंगमंचाची नाळ तुटता कामा नये, असे मत उदघाटक सिने - नाट्य दिग्दर्शक संकेत पावसे यांनी केले. या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार मांडले. विविध शॉर्ट फिल्म फेस्टिवल आणि राज्य नाट्य स्पर्धा, विविध एकांकिका स्पर्धेतील कलावंतांचा उदघाटन सोहळ्याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त नगर शहरातील सर्व मान्यवर पत्रकार मित्रांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नटसम्राट स्व.डॉ.श्रीराम लागू, तरुण रंगकर्मी स्व.रविंद्र वाणी, स्व.प्रताप ठाकुर, स्व.प्रमोद खांडेकर, स्व.विजू खोटे या दिवंगत मान्यवरांना या प्रसंगी अक्षर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर अक्षर करंडक स्पर्धा महोत्सव स्थळाला अक्षर विचार प्रतिष्ठान च्या वतीने नटसम्राट स्व.डॉ.श्रीराम लागू नाट्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.
 उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक अक्षर परिवाराचे प्रमुख कार्यवाह ऋषिकेश पठारे यांनी केले तर आभार प्रदर्शन रितेश साळूंके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दर्शन काळे यांनी केले रविवार दि. 22 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी ऋषिकेश पठारे, प्रसाद बेडेकर, मयूर करंजे, प्रशांत जठार, रोहन पठारे, श्रीनिवास वड्डेपेल्ली, नानाभाऊ मोरे, विशाल दाभाडे, विवेक पंडित, प्रा.अशोक सागडे, अमोल खोले, गणेश मोरे, पी.डी.कुलकर्णी, देविदास हिरे, गंगाधर निमसे, दिलीप जाधव, अक्षय मुनोत, नितेश कटारिया, अनुराग मंदाडे, चाणक्य मंदाडे, आदित्य मंदाडे, सुरेश वड्डेपेल्ली, प्रवीण रच्चा, सौरभ धोत्रे, अभिजित निमसे, सागर गाडेकर, रोहित जाधव, आकाश ग्रोव्हर, सॅम जेऊरकर, ऋषिकेश जाधव, गणेश मोरे, राजू येमूल, अमोल चोपडे, सौ.धनश्री खोले, सौ.वृषाली मंदाडे, सौ.क्रांती निमसे, सौ.पायल पठारे, सौ.सपना साळूंके, कु.निकिता निमसे, सौ.संध्या शिरसुल, शेखर वाघ, प्रमोद गुंजाळ, किरण धुमाळ, संदेश नेटके, राहुल वड्डेपेल्ली, ऋषिराज वड्डेपेल्ली, मल्लेशाम बिर्रू, वैभव सावंत, हे परिश्रम घेत आहेत. अशी माहिती संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख राकेश पडगे यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post