'शिकारा' फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट
माय अहमदनगर वेब टीम- विधू विनोद चोप्रा लवकरच 'शिकारा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाची व्यथा व्यक्त करणा-या 'शिकारा' या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरच्या सुरूवातीस काही घोषणा ऐकू येतात. "19 जानेवारी 1990 रोजी हजारो काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून पलायन करावे लागले होते, 19 जानेवारी 2020 रोजी 30 वर्षांनंतर आमची कहाणी सांगितली जाईल", असे नॅरेटरच्या आवाजात ऐकू येते.
फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार चित्रपट
फॉक्स स्टार या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात 4 लाखांहून अधिक काश्मिरी पंडितांची काश्मिरमधून पलायन करण्यामागची वेदना दाखवली जाईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती विधू विनोद चोप्रा यांची आहे. चित्रपटाचा ट्रेलर 7 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल, तर चित्रपट 7 फेब्रुवारी 2020 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
Post a Comment